घरमनोरंजननोरा फतेहीच्या गाण्यावर थिरकला नॉर्वेचा डान्स ग्रुप, सोशल मीडियावर व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद

नोरा फतेहीच्या गाण्यावर थिरकला नॉर्वेचा डान्स ग्रुप, सोशल मीडियावर व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद

Subscribe

अलीकडेच, त्यांच्या नवीन व्हिडिओसाठी, नॉर्वेमधील लोकप्रिय नृत्य गट नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यावर चित्रित केलेल्या 'थँक गॉड' चित्रपटातील 'मानिके' गाण्यावर नाचताना दिसत आहे.

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग अशी दमदार स्टार कास्ट असलेला ‘थँक गॉड’ या चित्रपटातील ‘मानिके’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात बॉलिवूड यामधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हे गाणं रिलीज प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. यावर चाहते रिल्स सुद्धा बनवत आहेत. अलीकडेच, त्यांच्या नवीन व्हिडिओसाठी, नॉर्वेमधील लोकप्रिय नृत्य गट नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यावर चित्रित केलेल्या ‘थँक गॉड’ चित्रपटातील ‘मानिके’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

हे ही वाचा – चिरंजीवी आणि सलमान खानच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

- Advertisement -

नुकतंच, या व्हायरल व्हिडिओमध्ये, लोकप्रिय नॉर्वे डान्स ग्रुप जबरदस्त डान्स मूव्ह करताना दिसत आहे. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्स सुद्धा चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. नॉर्वेजियन डान्स ग्रुपचा हा डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजत आहे. हा व्हिडीओसुद्धा खूप पाहिला जात आहे आणि त्याला खूप लाईक्स सुद्धा मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by YouTube India (@youtubeindia)

- Advertisement -

हे ही वाचा – …म्हणून तापसी पन्नूने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जायला दिला नकार

ही क्लिप यूट्यूब इंडियाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दरम्यान आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केली आहे. त्याच बरोबर हा व्हिडिओ आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला गेला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

हे ही वाचा –  ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -