घरमनोरंजनलक्ष्मीचा 'हा' डान्स श्रध्दा कपूरनेही केला इन्स्टावर शेअर

लक्ष्मीचा ‘हा’ डान्स श्रध्दा कपूरनेही केला इन्स्टावर शेअर

Subscribe

क्ष्मीचा एक डान्स व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हा अभिनेत्री श्रध्दा कपूरसह अनेकांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवाल कोणाला माहित नाही असं नाही. आपल्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यात लक्ष्मी खचून न जाता धीराने उभी राहीली. लक्ष्मीमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. सध्या लक्ष्मीचा एक डान्स व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हा अभिनेत्री श्रध्दा कपूरसह अनेकांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

????❤️ @thelaxmiagarwal

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 या व्हिडीओत लक्ष्मी श्रध्दा कपूरच्या बागी चित्रपटातील ‘मैं नाचूं आज छम छम छम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात लक्ष्मी श्रध्दाने केलेल्या गाण्यातील स्टेप्स करताना दिसत आहे. लक्ष्मीने खूपच सुंदर डान्स करताना या व्हिडीयोत दिसत आहे. हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ १५ लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री श्रध्दा कपूरने ही हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ शेअर करताना श्रध्दाने हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

- Advertisement -

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मीने खचून न जाता, असंख्य पीडितांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. यातूनच तिने तिची नवी ओळख निर्माण केली. त्यामुळे तिच्या कामाची दखल बॉलिवूडने घेतली असून तिच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -