विजय साळगावकरच्या केसचा तपास करणार एसीपी प्रद्युम्न आणि सीआयडी टीम

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘दृश्यम 2’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, आता अनेकांचे लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले आहे. हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान,अशातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती शेअर केली आहे.

अजयने दिली माहिती
20 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन वाहिनीवरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असणारा सीआयडी कार्यक्रमाबद्दल आजही प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील हा सर्वाधिक चालणार कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे चाहते त्याच्या दुसऱ्या भाग सुरु करावा अशी मागणी देखील वारंवार करत असतात. दरम्यान, आता सीआयडीची टीम प्रेक्षकांना अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’मध्ये पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

याबाबत माहिती देत अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एसीपी प्रद्युम्न, इंसपेक्टर अभिजीत आणि दया, विजय साळगावकरच्या केसचा तपास करताना दिसत आहेत. या व्हिडीओ खाली अजयने लिहिलंय की, “केस पुन्हा सुरु झाली नाही, यांचा तपास सुरु”.

‘दृश्यम’ ने जिंकलं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, येत्या 18 नोव्हेंबर रोजी ‘दृश्यम 2’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 


टीव्ही जगताला हादरा; ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू