घरमनोरंजनराजकुमार रावची आर्थिक फसवणूक; पॅनकार्डच्या माध्यमातून घेण्यात आले लोन

राजकुमार रावची आर्थिक फसवणूक; पॅनकार्डच्या माध्यमातून घेण्यात आले लोन

Subscribe

सध्या जगभरात ऑनलाईन गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा फटका फक्त सर्वसामान्यांना नाही तर सेलिब्रिटींना बसण्यास सुरुवात झाली आहे. राजकुमार राव हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. राजकुमार सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या राजकुमार त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. परंतु सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे राजकुमार राव आता चर्चेत आला आहे. अज्ञात व्यक्तीने राजकुमारची आर्थिक फसवणूक केली आहे. याची माहिती राजकुमारने त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमधून दिली आहे.

- Advertisement -

राजकुमार रावने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, अज्ञात व्यक्तीने माझ्या पॅनकार्डचा गैरवापर करून 2 हजार 500 रुपयांचे कर्ज घेतलं आहे. यामुळे यामुळे माझा क्रेडिट स्कोर खराब होई, अभिनेत्याने ट्विटमध्ये CIBIL अधिकारींना टॅग करत लिहिले की, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडने यासंबंधीत चौकशी करा आणि यापुढे असे होणार नाही याची काळजी घ्या. दरम्यान राजकुमार रावसोबत झालेल्या या फसवणूकीमुळे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच इतक्या कमी रकमेने कोणाचाही CIBIL स्कोर कसा खराब होऊ शकतो सवाल उपस्थित करत आहेत. त्यामुळे राजकुमारची ही पोस्ट खरीचं आहे की काही पब्लिसिटी स्टंटचा भाग आहे असा प्रश्नही नेटकरी करत आहेत.

राजकुमार रावचे यापूर्वी ‘हम दो हमारे दो’ आणि ‘बधाई दो’ असे दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. यानंतर लवकरच तो आगामी ‘मोनिका ओ माई डार्लिंग’ चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी तयार आहे. या व्यतिरिक्त तो ‘गन्स एन्ड गुलाब्स’ या सीरिजमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.


IRCTC Navratri Special : चैत्र नवरात्रीनिमित्त भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी स्पेशल ‘Vrat Thali’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -