बॉलिवूडकरांना करण जोहरची पार्टी पडली महागात; कतरिनानंतर आता शाहरुखलाही कोरोनाची लागण

अभिनेत्री कतरिना कैफ (Actor Katrina Kaif) कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) निघाल्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. शाहरुखसुद्धा करण जोहरच्या पार्टीत सहभागी होता.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्या वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) कोरोनासाठी हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरला आहे. अभिनेत्री कतरिना कैफ (Actor Katrina Kaif) कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) निघाल्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. शाहरुखसुद्धा करण जोहरच्या पार्टीत सहभागी होता.

२५ मे रोजी यशराज स्टुडिओमध्ये (Yashraj Studio) करण जोहरने आपल्या ५० व्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र, ही पार्टी आता कोरोना हॉटस्पॉट ठरली आहे. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार या पार्टीतील जवळपास ५० ते ५५ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता शाहरुख खान याचाही समावेश आहे.

फिल्मफेअने (Filmfare) त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाहरुख खानला कोरोना झाल्याची माहिती पोस्ट केली आहे. ‘शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह. आम्ही अभिनेत्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करतो.’ अशी पोस्ट फिल्मफेअरने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

शाहरुख खानही करण जोहरच्या पार्टीला उपस्थित होता. तो रेड कार्पेटवर (Red Carpet) दिसला नाही. मात्र, डान्स फ्लोअरवर कोई मिल गया गाण्यावर नाचताना तो दिसला.

दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Kartik Aryan corona positive) ४ जून रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळळा. मात्र, तो करण जोहरच्या बर्थडे पार्टीला उपस्थित नव्हता. त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा आयफा २०२२ मधील परफॉर्मन्सही मिस झाला. यानंतर शनिवारी आदित्य रॉय कपूर (Actor Aditya Roy kapoor) देखील कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती समोर आली. एका पाठोपाठ एक कलाकार कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने बॉलिवूडकरांवर कोरोनाचं सावट पसरलं आहे. त्यातच, करण जोहरची पार्टी सुपरस्प्रेडर ठरल्याचं म्हटलं जात आहे.