घरमनोरंजनराज कुंद्राने नाही तर शिल्पाने ॲपसाठी दिली होती ऑफर..सेलिना जेटली

राज कुंद्राने नाही तर शिल्पाने ॲपसाठी दिली होती ऑफर..सेलिना जेटली

Subscribe

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना या ॲपसाठी अप्रोच करण्यात आले होते.

पॉर्नोग्राफी केसमध्ये अत्रिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. राजच्या व्हॉट्सॲप चॅट, फोन आणि साक्षीदारांची चौकशी केली असता राजच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा,गेहना वशिष्ठ, पुनम पांडे पाठोपाठ आता अत्रिनेत्री सेलिना जेटली बाबत अनेक अफवा माध्यमावर तसेच सोशल मीडियावर पसरत आहेत. राज कुंद्राने ॲप प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सेलिना जेटलीला सुद्ध ऑफर दिली होती अशी माहिती काही दिवसापुर्वी समोर आली होती. पण आता सेलिनाच्या प्रवक्त्यातर्फे ही माहिती निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.सेलिना जेटलीच्या प्रवक्त्यानी दिलेल्या माहितीनुसार सेलिनाला शिल्पा शेट्टी च्या JL Streams मध्ये काम करण्यासाची ऑफर देण्यात आली होती. आणि हा ॲप एक प्रोफेशनल्स लोकांसाठी एक डिंसेट Influencerॲप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

- Advertisement -

सेलिनाला हॉटशॉटसाठी अप्रोच करण्यात आलं नाहीये. तिला या बाबत काहीच ठाऊक नाही आहे. तसेच शिल्पा आणि सेलिना यांचे मैत्रिपुर्ण संबध असल्याने सेलिनाला JL Streams ॲप जॉईंट करण्यासाठी एका इवेंन्टमध्ये बोलवण्यात आले होते. तसेच या ॲप लाँन्च दरम्यान सेलिना दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ती इवेंन्टमध्ये सहभाग घेऊ शकली नाही. याखेरीज अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना या ॲपसाठी अप्रोच करण्यात आले होते. असा खुलासा सेलिनातर्फे करण्यात आला आहे.


हे हि वाचा – चौकशी दरम्यान शिल्पाला कोसळले रडू, संतापाच्या भरात राज कुंद्राला म्हणाली हे तू का केलंस?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -