Adish Vaidya: तृप्ती देसाईंनंतर अभिनेता आदिश वैद्यसह ‘हे’ मराठी कलाकार कोरोना पॉझिटीव्ह

मराठीतील अनेक दिग्गज मंडळींना मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

After Bigg Boss marathi fame Trupti Desai with actor Adish Vaidya and these Marathi artist Corona Positive
Adish Vaidya: तृप्ती देसाईंनंतर अभिनेता आदिश वैद्यसह 'हे' मराठी कलाकार कोरोना पॉझिटीव्ह*

बॉलिवूड कलाकारानंतर कोरोनाने आता मराठी सिनेसृष्टी आणि कलाकारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बिग बॉस मराठी ३ च्या घरातील स्पर्धक तृप्ती देसाई यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता बिग बॉस मराठी ३ च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या अभिनेता आदिश वैद्यला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आदिशने मीडियावर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली आहे. आदिशने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adish Vaidya (@adishvaidya_92)

आदिशने काही दिवसांपूर्वी सेलिब्रेटी क्रिकेट लीगमध्ये हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे बिग बॉसमधून बाहेर आल्यांनंतर त्याने अनेक ठिकाणी भेट दिली होती तसेच अनेक चाहते त्याला भेटले होते. या दिवसात आदिश अनेकांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

आदिशने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. मी लवकरच बरा होईन. सर्वांनी काळजी घ्या’.

बिग बॉसला झाला कोरोना

प्रेक्षकांच्या लाडक्या बिग बॉसना (bigg Boss) देखील कोरोनाने गाठले आहे. स्पर्धकांची सतत काळजी घेणाऱ्या बिग बॉसना कोरोनाची लागण झाली आहे. बिग बॉसचा खरा आवाज असलेले अतुल कपूर (Atul Kapoor) कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बिग बॉसच कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बिग बॉस 15 दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आला.

अनेक मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात

मराठीतील अनेक दिग्गज मंडळींना मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी (Jetendra Joshi Corona Positive)  नेहा पेंड ( Neha Pendse Corona Positive) या मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

तर पांडू (Pandu Movie)  फेम निर्माते विजू माने (Viju mane)  देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. विजू माने सध्या घरीच क्वारंटाइन असून उपचार घेत आहेत. ‘साला आलाच तो मेसेज नशिबात माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्या. आणि गरज असेल तर टेस्ट करून घ्या.
#positive मी असतोच. करोनाने शिक्कामोर्तब केलं’, असे विजू माने यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)


हेही वाचा –  Jitendra Joshi: ‘कोरोनाने मला निवडले पण कोणत्या ते रिपोर्ट आल्यावर कळेल’ – जितेंद्र जोशी