घरमनोरंजन'लाल सिंह चड्ढा'नंतर नेटकरी करतायत 'पठाण'वर देखील बॉयकॉटची मागणी

‘लाल सिंह चड्ढा’नंतर नेटकरी करतायत ‘पठाण’वर देखील बॉयकॉटची मागणी

Subscribe

2022 च्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला. दरम्यान, आता 2023 ची सुरुवात देखील बॉयकॉटने होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.

सोशल मीडियावर #BoycottPathan होतंय ट्रेंड
सध्या सोशल मीडियावर #BoycottPathan आणि #BoycottbollywoodCompletely असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. या व्यतिरिक्त शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला देखील ट्रोल केलं जात आहे.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून होतोय ‘पठाण’ला विरोध

जेव्हापासून ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून चित्रपटाला विरोध केला जात आहे. या टीझरमध्ये शाहरुखने भारतात असहिष्णुता पसरत आहे असे म्हटले होते. शिवाय चित्रपटातील बेशरम रंग हे बोल्ड गाणं प्रदर्शित झाल्याचे पाहून ट्रोलर्स संतप्त झाले आहेत.

- Advertisement -


याव्यतिरिक्त आणखी एक कारण म्हणजे शाहरुखचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांचे सेवन करणारा आहे आणि तरीही मुंबईतील क्रूझ ड्रग केसमधून त्याची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे शाहरुखचा सिनेमा न पाहण्याचा निर्णय नेटकऱ्यांनी घेतला आहे.

या चित्रपटांनाही करण्यात आलं बॉयकॉट 

2022 मध्ये आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटांवर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. बॉयकॉट ट्रेंडमुळे या चित्रपटांना मोठा फटका बसला होता.


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ने अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकब्लस्टर चित्रपटांना देखील टाकलं मागे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -