घरमनोरंजनअजय देवगणने केलं अजब ट्वीट!

अजय देवगणने केलं अजब ट्वीट!

Subscribe

अजय देवगण आज त्याच्या एक ट्विटमुळे ट्रोल होत आहे. अजयने संध्याकाळी पाचच्या सुमारास एक ट्वीट केलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजयने हे असं ट्वीट का केलं? हा एकच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय. अजयने चक्क त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोलचा व्हाट्सअॅप नंबर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याच्या या चमत्कारिक ट्वीटमुळे नेटिझन्सने अजयची टर उडवायला सुरुवात केली आहे.

अजयने ट्वीट केलं की, ‘काजोल भारतात नाहीये, तिला व्हॉट्सअप वर 982…..0 या नंबरवर संपर्क साधा. अजयच्या या अजब ट्वीटमुळे सगळेच चक्रावले आहेत. अजयच्या या ट्वीटवर नेटीझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत!

- Advertisement -

- Advertisement -

आता हे असं ट्वीट अजय देवगणने का केलं? हे सध्या कोडचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -