घरमनोरंजनविक्की - कतरिनाच्या शाही विवाह सोहळ्याची अक्षयने उडवली खिल्ली

विक्की – कतरिनाच्या शाही विवाह सोहळ्याची अक्षयने उडवली खिल्ली

Subscribe

बॉलिवूडचे बहुचर्चित कपल विक्की कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) नुकतंच रॉयल विवाह सोहळा पार पडला. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर या सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील कलाकार अनुउपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विक्की आणि कतरिनाला चाहत्यांसह दिग्गज कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षय कुमराने ‘कपिल शर्मा शो’ दरम्यान दोघांच्याही लग्नाची खिल्ली उडवली आहे. सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत अकांऊटवर शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये अक्षयने केलेल्या वक्तव्यानंतर सेटवर तुफान हास्यकळ्ळोल सुरू झाला.

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार याच्या विनोदबुद्दी स्वभावाचा प्रत्यय अनेकदा त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सिनेमातून आपल्या समोर येत असतो. एक कॉमिडीयनसह अक्षय त्याच्या हजर जबाबीपणासाठी देखील तितकांच लोकप्रिय आहे. नुकतंच अक्षयने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या सोबत अभिनेत्री सारा अली खानसुद्धा होती. त्यांचा आगामी ‘अतरंगी रे’ हा सिनेमा प्रदर्शनच्या वाटेवर असून सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि साराने कपिल शर्माच्या सेटवर आले. दरम्यान, यावेळी शोमध्ये गमतिशीर संवाद सुरू होता. तेव्हा विक्की आणि कतरिनाच्या लग्नावर विनोद सुरू झाला.

- Advertisement -

सेटवर जेव्हा कॉमेडियन किकू शारदाची एंट्री होते तेव्हा तो म्हणतो की, “मी आत्ताच राजस्थानमधील एका हायप्रोफाईल लग्नाला हजेरी लावून आलोय. हा विवाहसोहळा एवढा भव्य होता की मी कधीच पाहिला नाही. कारण, मला त्यांनी पाहूच दिलं नाही. पण लग्न खूप छान पार पडलं.” असं किकू म्हणतो यावर अक्षय मजेशीर प्रतिक्रिया देतो. “त्या ठिकाणी तुम्ही किट-कॅटही खाल्लं असेल.” अक्षयचा जोक ऐकून सेटवर एकच हशा पिकला अभिनेत्री सारा अली खानसह सर्वचजण जोरजोरात हसू लागले.

व्हिडिओ पाहा –

- Advertisement -


हे हि वाचा –  क्वारंटाईनचे नियम मोडीत काढल्यानंतर आलियावर BMC करणार कारवाई ? झाला मोठा खुलासा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -