Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रामसेतु' च्या शूटिंगला सुरुवात

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘रामसेतु’ च्या शूटिंगला सुरुवात

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या रामसेतू चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त अयोध्येत पार पडला. अक्षयने या आगामी राम सेतू सिनेमातील फस्ट लूकचे काही फोटो शेअर केला आहेत. यात अक्षय कुमार एकदम हटके गेटअपमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये अक्षय लांब केसांमध्ये दिसत आहे, डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला आहे. अक्षयने या लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांचे खूप त्याच्या या लूकवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. क्षयची ही खास शैली चाहत्यांनाही खूप आवडली आहे या चित्रपटात अक्षयसह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार असून सहनिर्मिती अरुण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा करणार आहे.

अक्षयने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, त्याच्या राम सेतु चित्रपटाचे चित्रीकरण आजपासून सुरू झाले आहे. माझा आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या सिनेमांपैकी रामसेतू एक आहे. रामसेतूच्या शुटिंगला सुरुवात.. या चित्रपटात मी एका पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. या लूकबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

या चित्रपटाची कथा रामायण काळातील राम सेतूच्या शोधावर आधारित आहे असा अंदाज बांधला जात आहे. काही दिवसांपूर्वीच रामसेतू सिनेमाची संपूर्ण टीम शूटसाठी अयोध्येत पोहचली होती. यावेळचेही अनेक फोटो अक्षयने शेअर केले होते. ज्यामध्ये राम सेतु चित्रपटाचे शुटिंगच्या मुहूर्ताची पूजा सुरु होती. तसेच संपूर्ण राम दरबार दिसत आहे. हे फोटो शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले आहे की, ‘आज श्री अयोध्या जी में फ़िल्म “रामसेतु” के शुभारंभ पर भगवान श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ। जय श्री राम!’ अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. या पोस्टद्वारे चाहत्यांनी ‘राम सेतु’साठी अक्षय कुमारला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु चित्रपटातील अक्षयचा नवा लुक नुकताच रिलीझ झाल्याने चाहत्यांमध्ये आता चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -


 

- Advertisement -