घरमनोरंजनCorona: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने कोरोना वॉरियर्सना दिलं सरप्राईज!, डॉक्टरांनी मानले आभार

Corona: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने कोरोना वॉरियर्सना दिलं सरप्राईज!, डॉक्टरांनी मानले आभार

Subscribe

या कामासाठी चाहते आलियाचे कौतुक करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या काळात सामान्य लोकांपासून बॉलिवूड कलाकारही आपापल्या पद्धतीने जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरेच कलाकार मंडळी आर्थिक सहाय्य करत आहेत तर काही गरीब मजुरांच्या अन्नाची व्यवस्था करताना दिसताय. यासह काही कलाकार डॉक्टरांना देखील मदत करताना दिसताय. अलीकडेच आलिया भट्टने देखील पुढाकार घेऊन कोरोना वॉरियर्सना सरप्राईज देत त्यांना केअर पॅकेज दिले आहे. आलियाच्या या पुढाकाराबद्दल तिचे कौतुक केले जात असून डॉक्टरांनी आभार देखील मानले आहे.

दरम्यान, मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर श्रीपाद गंगापूरकर यांनी एक फोटो शेअर केले असून त्यात चॉकले बार, बन, ड्रिंक आणि काही स्नॅक्सही दिसत आहे. यासह आलियाने कागदावर चिठ्ठी देखील लिहीली आहे, ज्यात म्हटले आहे की, ” लोकांना निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जे काही करत आहात त्याबद्दल धन्यवाद! तूम्हीच खरे हिरो आहात. ‘

- Advertisement -

 

- Advertisement -

यावर डॉ श्रीपाद गंगापूरकर यांनी आलिया भट्टने दिलेल्या या सरप्राईजबद्दल आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, ‘ धन्यवाद! आलिया भट्ट तुम्ही दिलेल्या या गोड सरप्राईजसाठी… कोरोना सारख्या महामारीच्या धोकादायक काळात तुमची भेट खूप खास आहे. ‘

एका यूजरला उत्तर देताना डॉ. श्रीपाद गंगापूरकर यांनी असे सांगितले आहे की, आलिया भट्टने दिलेले हे सरप्राईज मुंबईतील सर्व डॉक्टरांना देखील पाठवले आहे. त्यांनी ट्वीट केले की, “आलिया भट्ट यांनी मुंबईतील कोरोनाच्या आजारावर लढा देण्यासाठी सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही चॉकलेट पाठविली आहेत.” या कामासाठी चाहते आलियाचे कौतुक करत आहेत.


LockDown: नवाजुद्दीन कुटुंबासह साजरी करणार ईद!, १४ दिवस मायदेशी राहणार क्वारंटाईन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -