घरमनोरंजन‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का' म्हणत रोहितवर कंगना भडकली

‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ म्हणत रोहितवर कंगना भडकली

Subscribe

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेले दोन मिहिन्यांहून अधिक दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. कारण प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं. यानंतर बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी ट्विट करायला सरुवात केली. भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करु नये असं ट्विट सर्व कलाकार, खेळाडू करत आहेत. भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने देखील ट्विट केलं. रोहित शर्माच्या ट्विटवर कंगना चांगलीच संतापली आहे. धोबी का कुत्ता, घर का ना घाट का, असं म्हणत कंगनाने रोहित शर्मावर संताप व्यक्त केला आहे.

रिहानाच्या ट्विटनंतर सचिन तेंडूलकर, विराट कोहलीसह रोहित शर्माने ट्विट केलं. “जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्यांवर तोडगा काढणं ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू,” असं ट्विट रोहित शर्माने केलं आहे. या ट्विटला प्रतिक्रिया देताना कंगना सर्वच क्रिकेटपटूंवर भडकली.

- Advertisement -

“हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत? शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करत आहेत? असा सवाल कंगनाने विचारलाय. “हे दहशतवादी आहेत, आणि गोंधळ घालत आहेत. असं म्हणा ना! भीती वाटते का?” असं कंगनाने रोहितच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं आहे.

“हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?” शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करतील? असा सवाल कंगनाने विचारलाय. तसेच, "हे दहशतवादी आहेत, आणि गोंधळ घालत आहेत. असं म्हणा ना की, ते दहशतवादी आहेत, भीती वाटते का ? असं उत्तर कंगनाने रोहितच्या ट्विटवर केलं आहे.  कंगनाच्या या ट्विटवर रोहित शर्मा रिप्लाय देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघुया अन्य क्रिकेटपटुंनी काय प्रतिक्रिया दिली होती...

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -