घरमनोरंजन'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची भूमिका; विकी कौशलनेही केले कौतुक

‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याची भूमिका; विकी कौशलनेही केले कौतुक

Subscribe

'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्रीय कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर अशी स्टार कास्ट आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक उत्तोमोत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला की त्या चित्रपटातील स्टार कास्ट, गाणी यांची चर्चा नेहमीच होत असते. अशातच ‘गोविंदा नाम मेरा’ या हिंदी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड मधील मोठे स्टार असूनही चर्चा मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्याची होत आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्रीय कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर अशी स्टार कास्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड मधील आघाडीचे कलाकार या चित्रपटात असताना चर्चा मात्र मराठमोळा अभिनेता अमेय वाघ यांची होते आहे. ‘झोम्बिवली’ फेम अभिनेता अमेय वाघ ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात विकी कौशलच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे.

- Advertisement -

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अमेय वाघ चर्चेत आला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या चित्रपटात अमेय वाघ महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड चित्रपटात देखील अमेय वाघ आता आपल्या अभिनयाचा ठसा उमटविण्यासाठी सज्ज झाला आहे. या आधी अमेयने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात अमेयने काम केले आहे त्याच्या कामाचे कौतुक खुद्द विकी कौशलने सुद्धा केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

- Advertisement -

अभिनेता अमेय वाघ याने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर विकी कौशलने देखील कमेंट केली आहे. या पोस्टरमध्ये अमेय वाघ वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरवर ‘गोविंदाचा वेडा मित्र’ असं लिहिण्यात आलेलं आहे. हा चित्रपट 16 डिसेंबरला चित्रपट डिस्नेप्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पोस्टवर विकी कौशलने कमेंट करत अमेयचं कौतुक केलं आहे.

‘मित्रा तुझ्यासोबत काम करताना खूप मजा आली. लवकरच भेटू!’, अशी कमेंट विकी कौशल याने केली आहे. अमेय वाघच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. हिंदी चित्रपटाच्या या नव्या प्रवासासाठी अनेकांनी अमेय वाघला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची वाट पाहत होते.


हे ही वाचा – भारतात आजपासून ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -