राज्यपाल म्हणायचे, अभी बस, अभी मुझे जाना है”, अजित पवारांनी सांगितला किस्सा

sharad pawar reaction karnataka government over attack on maharashtra vehicles over border dispute

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वकव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांकडून याचा तीव्र शब्दात निषेध केला, तसेच राज्यपालांनी पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी केली. त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली. या घटनेवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (ajit pawar criticizes governor bhagat singh koshyari over chhatrapati shivaji maharaj remarks row)

अजित पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे वेगवेगळे वक्तव्य करण्यात येत आहेत.याने समाजात तेढ निर्माण होत आहे. यावेळी मी दोघांना भेटून हे आवरा.. या वाचाळवीरांना कुठे तरी थांबवा, काय सांगायचं आहे ते त्यांना सांगा, यात बदल झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाही असं सांगितले.

अजित पवार म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्यानिमित्त राज्यपाल कोश्यारींच्या विचारांमधील अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लागू दे अशी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य सर्वांनाच चीड आणणारे होते. मी आजही या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार असं का बोलतात का वागतात? आणि सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात हे महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे.

मी राज्यपालांना विरोधी पक्षनेता म्हणून भेटू शकतो. मी त्यांना उपमुख्यमंत्री होतो तेव्हा देखील भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है. मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा. त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का?, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होत आहे, अस अजित पवार म्हणाले.

यशवंत चव्हाण यांच्या सरकारपासून ते वेगवेगळ्या सरकारमध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत नव्हती. तशापद्धतीने महाराष्ट्राने ऐकलं नाही खपून सुद्धा घेतलं नाही. आता वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींनापण यात तारतम्या राहिलं नाही. आपण काय बोलतो,, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बोलूनच्या बोलून ते प्रवक्ते माझी काही चूक झालेली नाही, जो अर्थ काढला तोच चुकीचा काढला म्हणतात. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी कहर केला, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा कोणाविषयी आपण काय बोलतो त्यावेळी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. केवळ सत्ताधारी पक्षचं नाही तर विरोधी पक्ष आणि विविध राजकीय पक्ष नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते त्यांचे आमदारांनी तारतम्य ठेवत, कायदा, संविधान काय सांगतो याकडे लक्ष दिले पाहिजे. असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे.


पुणे विद्यापीठ ‘सिनेट’वर विकास मंचची सत्ता;नाशिकचे सोनवणे, वैद्य विजयी