Action Scene शूट करताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी, सगळी कामं थांबवली

amitabh bacchan

Amitabh Bacchan Injured during Shooting | बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून ही माहिती दिली. अमिताभ बच्चन नियमित सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतात. आपल्या चित्रिकरणाच्या व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडिया पोस्ट आणि ब्लॉगच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांविषयी सांगत असतात. आता त्यांच्या एका अपघाताविषयी त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट केला जात होता. त्यादरम्यान मी जखमी झालो. यामुळे बरगड्या मोडल्या आहेत. तर, उजव्या बरगडीच्या स्नायूलाही दुखापत झाली आहे. अपघातामुळे शूट रद्द करण्यात आले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्येही स्कॅन करण्यात आले आहे. आता मी घरी परतलो आहे… चालताना खूप त्रास होतोय. गोष्टी पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. वेदनांसाठी काही औषधेही दिली आहेत. जे काही काम करायचे होते ते तूर्तास स्थगित केले आहे. स्थिती सामान्य होईपर्यंत कोणतीही हालचाल न करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.”


प्रोजेक्ट के’ हा अॅक्शनपट आहे. नाग अश्विनने याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे. हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये उच्च पातळीवरील अॅक्शन पाहायला मिळणार आहे. असाच एक अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन जखमी झाले.

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक फिट ज्येष्ठ कलाकार म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. उंचाई हा त्यांचा नवा चित्रपट नुकताच रिलिज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आता ते प्रोजेक्ट के मध्ये व्यस्त होते. परंतु, अपघातामुळे त्यांना आता सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे ते पुन्हा केव्हा चित्रिकरणाला परतात हे पाहावं लागणार आहे.