घरमनोरंजनAmruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या 'शिव तांडव स्तोत्रम्' या नव्या गाण्याचे पोस्टर...

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या ‘शिव तांडव स्तोत्रम्’ या नव्या गाण्याचे पोस्टर रिलीज

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यामुळे, कधी फॅशनमुळे तर कधी राजकीय टीकांमुळे त्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. व्हलेंटाईन डे निमित्त त्यांनी त्यांच्या एका नव्या गाण्याची घोषणा केली होती. या नव्या गाण्याचं पोस्टर आज रिलीज झालं आहे. ‘शिव तांडव स्तोत्रम्’ असं त्या गाण्याचं नाव असून त्याचं पोस्टर सोशल मीडियावर त्यांनी रिलीज केलेय, हे गाणं 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अमृता फडणवीस यांच नवं गाणं आणि त्यातील गेटअप अनेकांसाठी एक कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भगवान शंकराच्या अवतारातील पोस्ट केलेला फोटोही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला होता. या फोटोमुळे अमृता फडणवीस आता कोणतं गाण रिलीज करणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. मात्र आज त्यांनी पुन्हा एक फोटो पोस्ट करत ‘शिव तांडव स्त्रोतम’ हे नवं गाणं चाहत्यांच्या भेटीस घेऊन येत असल्याचे जाहीर केलं आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत लिहिले की, || जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले || भक्ती ही दुर्मिळ आणि नेहमीच एक आकर्षक आध्यात्मिक यात्रा आहे! 24 फेब्रुवारी’ 2022 रोजी रिलीज होत आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात दैवी संगीतमय अनुभव @TimesMusicHub वर. या महाशिवरात्रीला माझ्यासोबत #ShivShambho आणि #ShivTandav Stotram चा जप करा.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मी तुझी निवड आता आणि कायमस्वरूपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात आहेत. व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या प्रिय लोकांबद्दल आपले प्रेम व्यक्त करायचे असते त्या दिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय स्तुती अर्पण करतेय,” अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी #valentine #lordshiva असे हॅशटॅगही वापरले होते. त्या फोटो आणि कॅप्शनवरुन त्यांचे आगामी गाणं भगवान शंकरावर आधारित असल्याचे अंदाज चाहत्यांकडून बांधले जात होते. परंतु आजे हे अंदाज खरे ठरले आहे.

अमृता फडणवीस यांनी मंगळवारी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा करत त्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये अमृता फडणवीस हातात त्रिशुळ घेत भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहेत. हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायले असून शैलेश दाणीने यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

‘शिव तांडव स्तोत्रम्’ असे या गाण्याचे नाव असून ते 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती शेअर केली आहे.


पालिका प्रभाग रचनेवरील ३०० हरकती, सूचनांवर सुनावणी पूर्ण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -