घरमनोरंजनअनुराग कश्यपला मुंबईत 30 वर्ष पूर्ण झाल्याने फोटो शेअर करत कर्मभूमीचे मानले...

अनुराग कश्यपला मुंबईत 30 वर्ष पूर्ण झाल्याने फोटो शेअर करत कर्मभूमीचे मानले आभार

Subscribe

बॉलिवूड मधील दिग्गज दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियात खुप अॅक्टिव्ह असतो. सध्या तो सोशल मीडियात विविध मुद्द्यांवर आपले मतं मांडत असतो. अशातच पुन्हा एकदा त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट अन्य पोस्ट प्रमाणे नसून फार वेगळी आहे. त्याने त्यात असे म्हटले आहे की, तो कसा आणि कधी पहिल्यांदाच स्वप्नगरी मुंबईत आला होता. (Anurag Kashyap life journey)

अनुराग कश्यपने आपल्या पोस्टमध्ये एक ट्रेलर शेअर केला आहे. ज्यावर पंजाब मेल…मुंबई ते फिरोजपुर असे लिहिले आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने असे लिहिले की, 3 जून 1993. याच दिवशी दादर स्थानकात उतरलो, खुप पाऊस पडत होता. मला माहिती नव्हते, मुंबईत ऐवढा दीर्घकाळ पाऊस राहतो. मला अजूनही आठवते की, मी दादर ते अंधेरी असा पहिल्यांदा लोकल ट्रेनचा प्रवास केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

- Advertisement -

मला माझ्या एका मित्राला भेटायचे होते, जो माझ्याआधी दिल्लीहून मुंबईत आला होता. तेथे गेलो तेव्हा इम्तियाज अली यांचा सर्वाधिक स्पेशल सिनेमा ‘रॉकस्टार’ साठी इंस्पिरेशन बनायचे होते. मला जग्गू आणि इम्ती या दोघांकडून मुंबईत येण्याची हिंमत मिळाली. परंतु नंतर मास कॉम करण्यासाठी सेंट झेवियर्स कॉलेजला गेला. मी या शहराचा खुप आभारी आहे… सर्व मित्र आणि आठवणींसाठी सुद्धा की, त्यांनी मला खुप काही दिलेयं. अनुराग कश्यपने या पोस्टला हॅशटॅग देत कर्मभूमि असे लिहिले आहे. (Anurag Kashyap life journey)

- Advertisement -

अनुराग कश्यपने आपल्या 30 वर्षाच्या या करियरमध्ये ‘देवडी’, ‘गुलाल’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘नो स्मोकिंग’, ‘रमन राघव 2.0’, ‘अग्ली’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ सारखे दमदार सिनेमे केले. सध्या तो आपल्या अपकमिंग सिनेमा ‘कॅनेडी’ मुळे चर्चेत आहे, या सिनेमाला कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये एक ऑनर मिळाला आहे. या सिनेमाला द ग्रँन्ड लुमियर थिएटरमध्ये 7 मिनिट स्टँडिंग ओवेशन मिळाले होते.


हेही वाचा- ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते करणार 2 कोटींचा खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -