घरमनोरंजनसपना चौधरीचा सोशल मीडियाला राम-राम, चाहते पडले चिंतेत

सपना चौधरीचा सोशल मीडियाला राम-राम, चाहते पडले चिंतेत

Subscribe

राम राम... प्रकृती ठिक नसल्याने मी अपडेट नाही राहू शकतं, माफ करा, लवकरचं भेटू.. या बरोबरचं तिने एक सॅड इमोजी सुद्धा ठेवली आहे.

हरियाणाची सुप्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरीचे लाखो चाहते आहेत, तिच्या अदाकारीने ती अनेकांना घायाळ करत असते. तिच्या गाण्यांच्या माध्यमातून ती सोशल मीडियावर चाहत्यांचं नेहमीचं लक्ष वेधून घेते. सोशल मिडियावर लाखोंचा चाहता वर्ग असणारी सपना आता सोशल मीडिया पासून सुट्टी घेणार आहे. या संबंधीत तिने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती दिली आहे.

सपना इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती देत म्हणाली की, ‘राम राम… प्रकृती ठिक नसल्याने मी अपडेट नाही राहू शकतं, माफ करा, लवकरचं भेटू.. ‘ या बरोबरंचं तिने एक सॅड इमोजी सुद्धा ठेवली आहे. परंतु तिला नक्की काय झालंय हे याची माहिती तिने नाही दिली.

- Advertisement -

सपनाचे चाहते पडले चिंतेत

- Advertisement -

सपनाची आजारी असल्याची माहिती वाचताच तिचे चाहते काळजीत पडले आहेत, ते तिला लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत आहेत. मिडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार सपना चौधरी सतनामध्ये एका लाइव्ह कंसर्टमध्ये परफॉर्म करत होती. माहितीनुसार परफॉर्मंस संपल्यानंतर तिच्या अचानक पोटामध्ये दुखू लागलं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. जिथे तिला डॉक्टरांनी एका तासासाठी अंडर ऑब्जर्वेशनमध्ये ठेवलं होतं. इव्हेंट कंपनीच्या माहिती नुसार रविवारी हॉटेलमध्ये आराम केल्यानंतर सपनाच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला होता. त्यानंतर ती रामपुर बाघेलानमध्ये इवेंट करवणाऱ्या कारबाऱ्याच्या घरी चहा-नाष्ट्यासाठी गेली होती. त्यानंतर ती तिच्या टीम बरोबर खजुराहोसाठी रवाना झाली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सपना चौधरीचं एक नवीन गाणं लूट लिया हरयाणा फेमस झालेलं आहे. २५ फेब्रुवारीला हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला यूके हरयाणवी, हरिजीत दीवाना आणि अक्की आर्यन यांनी आवाज दिलेला आहे. तर या गाण्यामध्ये सपना चौधरी बरोबर अक्की आर्यन, यूके हरयाणवी आणि हरजीत दीवाना त्यांचा जलवा दाखवत आहेत. या गाण्याचं दिग्दर्शन सपना चौधरीनेचं केलं आहे.


हेही वाचा – …म्हणून ‘द मॅट्रिक्स’ची ऑफर लारा दत्ताने 2001 मध्ये नाकारली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -