चित्रपट पाहायच्या आधीच लोक… एआर रहमान यांनी केली ‘गांधी गोडसे : एक युद्ध’च्या दिग्दर्शकाची पाठराखण

‘द लेजंड ऑफ भगत सिंह’, ‘दामिनी’, ‘घायल’ आणि ‘खाकी’ यांसारच्या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी 9 वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शन करत आहेत. मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट आज (26 जानेवारी) प्रदर्शित होणार असून प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या कचाड्यात सापडला आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपटात महात्मा गांधी यांना कमीपणा दाखवून नथुराम गोडसेचा गौरव केल्याचा आरोप अनेकजण करत आहेत. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाला विरोध करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी एआर रहमान चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची पाठराखण केली आहे.

एआर रहमान यांनी केली दिग्दर्शकांची पाठराखण

Fans React To Rajkumar Santoshi's Gandhi Godse - Ek Yudh
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एआर रहमान म्हणाले की, “लोकांनी अजून चित्रपट पाहिला नाही, मात्र त्यांनी गृहीत धरले आहे की चित्रपटचा हा ट्रेलर एकतर्फी आहे. अलीकडे लोकांनी चित्रपट निर्मात्यांवर विश्वास ठेवणे सोडले आहे कारण त्यांना वाटते की चित्रपट निर्माते पक्षपाती आहेत. म्हणूनच दुर्दैवाने या चित्रपटाचे दिग्दर्शक द्वेषाला बळी पडत आहेत.” असं एआर रहमान म्हटलं आहे.

‘गांधी गोडसे: एक युद्ध’ च्या दिग्दर्शकांना धमकीचे फोन
दरम्यान, मागील काही दिवसांपासून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना काही लोकांकडून आपल्याला धमकावले जात असल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी देखील केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती.

Gandhi-Godse Ek Yudh Motion Poster Revealed By Rajkumar Santoshi

राजकुमार संतोषी यांनी याआधीचा चित्रपट 2013 मध्ये दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे नाव ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हे होते. या चित्रपटामध्ये शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. आता तब्बल 9 वर्षानंतर राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या माध्यामातून दिग्दर्शन करत आहेत. मात्र, हा चित्रपट किती यशस्वी ठरेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिल.

 


हेही वाचा :

शाहरुखच्या ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा; पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट