घरताज्या घडामोडीपुन्हा एकदा 'रावण' अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पसरली अफवा, लक्ष्मणाने दिले उत्तर

पुन्हा एकदा ‘रावण’ अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पसरली अफवा, लक्ष्मणाने दिले उत्तर

Subscribe

सोशल मीडियामुळे अनेक अफवा अधिक वेगात पसरवल्या जातात. चुकीची माहिती डोळे मिटून जगभर पसरवली जाते. मंगळवारी रात्री असेच काहीसे झाले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील ‘रावणा’ची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. पण या बातमीनंतर ‘लक्ष्मण’ची भूमिका करणारे अभिनेते सुनील लहरी यांनी निधनाचे वृत्त खोटे असल्याचे सांगून चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे असे की, एक वर्षापूर्वी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची वृत्त पसरले होते, जे त्यांच्या कुटुंबियांनी नाकारले होते.

आज सुनील लहरी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले. ज्यामध्ये अरविंद त्रिवेदी रावणाच्या लूकमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुनील लहरी अरविंद त्रिवेदींसोबत दिसत आहेत. हा फोटो एक दोन वर्ष जुना आहे.

- Advertisement -

हे फोटो शेअर करताना सुनील लहरी यांनी लिहिले आहे की, ‘कोरोनामुळे आजकाल कोणतींना कोणती तरी वाईट बातमी ऐकला मिळते. त्यात अरविंद त्रिवेदीजी (रावण)ची खोटी बातमी. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांसाठी माझी विनंती आहे की, कृपया अशी बातमी पसरवू नका. ईश्वराच्या कृपेने अरविंदजी ठीक आहेत आणि देव त्यांना नेहमी निरोगी ठेवो, अशी प्रार्थना करतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

याबाबत ‘सीता’ दीपिका चिखलिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, ‘परमेश्वराच्या कृपेमुळे अरविंद त्रिवेदीजी अगदी ठीक आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – सिंगर लकी अली यांच्या निधनाच्या अफवांना उधाण,मैत्रिणी नफीसा अलीने ट्विट करत केला खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -