घरमनोरंजन'बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया, अनिकेत लावणार 'लुक्स'ने तडका

‘बायकोला हवं तरी काय’मध्ये श्रेया, अनिकेत लावणार ‘लुक्स’ने तडका

Subscribe

नुकतीच ‘बायकोला हवं तरी काय' ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहेत.

नुकतीच ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले असून या वेबसिरीजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे ‘लूक्स’ या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

श्रेयाने साकारली सामान्य गृहिणीची भूमिका

या वेबसिरीजचे अजून एक खासियत म्हणजे कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि हँडसम अनिकेत विश्वासराव ही नवीन आणि फ्रेश जोडी आहे. या वेबसिरीजबद्दल सांगताना श्रेया म्हणाली, ‘मी यात एका सामान्य गृहिणीची भूमिका निभावत आहे. तिला तिच्या नवऱ्याने अपग्रेड व्हावे, असे वाटत असते. त्यासाठी ती देवाजवळ नेहमी मागणे मागते. तेव्हा तिला देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर जी मज्जा यायला सुरुवात होते यावर ही सिरीज आहे’.

- Advertisement -

एकाच वेबसिरीजमध्ये अनेक भूमिका साकारल्या

अनिकेत त्याच्या भूमिकेबद्दल सांगतो, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला एकाच वेबसिरीजमध्ये अनेक भूमिका निभावण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक भागात नवीन काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. ही सिरीज करताना खूप भारी वाटले आणि शिकायलाही खूप मिळालं. सिरीज बघतांना सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आपल्यासोबत सुद्धा, असे घडले तर? असे वाटेल. सर्वांची मने जोडणारी अशी ही सिरीज आहे’.


हेही वाचा – मैत्री आणि प्रेमाची सांगड घालणारा ‘फ्री हिट दणका’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -