उर्फी जावेदचा ‘सी थ्रू’ ड्रेसवर बोल्ड अंदाजात एअरपोर्ट जलवा, पहा फोटो

मीडियाला लुक देत मी 'किम कर्दर्शिया' होण्याचा प्रयत्न करत असल्याचे उर्फीने सांगितले

big boss fem actress urfi javed trolled for wearing see through top at airport
उर्फी जावेदचा 'सी थ्रू' ड्रेसवर बोल्ड अंदाजात एअरपोर्ट जलवा, पहा फोटो

बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्फी बिग बॉस ओटीटीमध्ये पहिल्या आठवड्यातच बाहेर आली होती. मात्र त्यानंतर ती काही ना काही कारणांवरुन सतत चर्चेत राहिली आहे. उर्फी तिच्या बोल्ड, ग्लॅमरस आणि फॅशन स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. उर्फीला पुन्हा एकदा एका हॉट अॅड बोल्ड अवतारात एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळी उर्फीच्या नव्या अंदाजामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या आधी देखील तिला अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे ट्रोल करण्यात आले होते.

उर्फीला एअरपोर्टला स्पॉट करण्यात आले तेव्हा उर्फीने ‘सी थ्रू’ ड्रेस घातला होता. ब्लॅक कलरचा सी थ्रू ट्रान्सफरंट टॉप आणि पॅन्ट घातली होती. उर्फीच्या सी थ्रू टॉपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे उर्फीवर आता ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. उर्फीचा एका व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यात ती मीडियाला लुक देत मी ‘किम कर्दर्शिया’ होण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे. किम कर्दर्शिया ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. किम देखील तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

उर्फीचा हा बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. तर काहींनी उर्फीचा हा लुक पाहून त्यांना अमेरिकेची मॉडल ‘बेला हदीद’ हीची आठवण झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीही उर्फीने बेला हदीदला कॉपी केले होते. सेलिब्रेटी जिथे जातील तिथे प्रसिद्ध फोटोग्राफर पापाराझी देखील असतात. यावेळी देखील उर्फी पापाराझींच्या कॅमेरात कैद झाली. पापाराझींसमोर उर्फी फारच दिखाऊपणा देखील करताना दिसली.


हेही वाचा – Matrix: घटस्फोटाच्या वादातच प्रियंका चोप्राच्या नव्या सिनेमाचे पोस्टर लाँच, नवा अवतार प्रेक्षकांसमोर