घर मनोरंजन बिपाशा बासू लवकरच होणार आई; बेबी बंपसह शेअर केले फोटो

बिपाशा बासू लवकरच होणार आई; बेबी बंपसह शेअर केले फोटो

Subscribe

बिपाशा बासूचं हे आगळंवेगळं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोंमध्ये करण आणि बिपाशाने रोमाँटिक पोज दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार आहे. नुकतंच बिपाशा बासूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या बेबी बंपचं फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशा बासूसोबत तिचा पती करण सिंह ग्रोवर सुद्धा दिसून येत आहे.

बिपाशा बासूचं हे आगळंवेगळं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोंमध्ये करण आणि बिपाशाने रोमाँटिक पोज दिल्या आहेत. शिवाय हा फोटो शेअर करत बिपाशा बासूने त्याखाली एक मोठं कॅप्शन देखील लिहिली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “एक नवीन वेळ, नवीन टप्पा…एक नवीन प्रकाशाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन रंग जोडलेला आहे. आता आयुष्य आधीपेक्षाही जास्त परिपूर्ण झालेला आहे. आधी आम्ही आमच्या आयुष्याच्या सुरूवातीत वेग-वेगळे होतो, पुन्हा आम्ही एकत्र आलो. तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

- Advertisement -

बिपाशाने पोस्टमध्ये मजेशीर अंदाजात लिहिलं की, “फक्त दोन लोकांसाठी प्रेम खूप जास्त आहे. हे आम्हाला चूकीचं वाटतं. त्यामुळे लवकरच आम्ही दोघांचे तिघे होणार आहोत. आमचं बाळ लवकरच आमच्या सोबतीला येईल.”

बिपाशाने चाहत्यांचे मानले आभार
या पोस्टमध्ये बिपाशाने पुढे लिहिलंय की,”माझ्यावरील प्रेमासाठी चाहत्यांचे खूप खूप आभार, तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थना नेहमी आमच्या सोबत असतील. आमच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी धन्यवाद.” बिपाशाच्या या पोस्टवर चाहते अनेक कमेंट्स करत तिला आणि करणला शुभेच्छा देत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बिपाशाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये करण आणि बिपाशा रोमॉंटिक अंदाजामध्ये दिसून येत आहेत. यात बिपाशाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तर करणने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे.


हेही वाचा :महागाईपासून लक्ष हटवण्यासाठी चित्रपटांवर टाकला जातोय बहिष्कार… अनुराग कश्यप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -