घरताज्या घडामोडीGangubai Kathiawadi: नववर्षाच्या प्रारंभीच आलियाचा 'गंगुबाई काठियावाडी' प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Gangubai Kathiawadi: नववर्षाच्या प्रारंभीच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Subscribe

ठाकरे सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयानंतर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केल्या आहेत. काही चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होणार असून काही चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये आलिया एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

आलियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ नव्या वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०२२ला प्रदर्शित होणार आहे. अनेक मीडियाच्या वृत्तानुसार, आलियाचा हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु लेटेस्ट माहितीनुसार, ‘गंगुबाई काठियावाडी’ ओटीटीवर नाही तर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

अभिनेत्री आलिया भट्टने स्वतः इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांसाठी ही गुडन्यूज दिली आहे. आलियाने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, ‘तुमच्यासाठी घेऊ येतेय, माझ्या हृदयाचा आणि आत्माच्या एक हिस्सा गंगुबाई काठियावाडी, जो ६ जानेवारी २०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

हेही वाचा – Sardar Udham Singh : ‘सरदार उधम सिंग’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -