घरमनोरंजनदीपिकाचा 'MAMI'च्या अध्यक्षपदाला रामराम!

दीपिकाचा ‘MAMI’च्या अध्यक्षपदाला रामराम!

Subscribe

दीपिकाने नुकताच सोशलमीडियाद्वारे पोस्ट करत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. दीपिकाने नुकताच सोशलमीडियाद्वारे पोस्ट करत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज(MAMI)या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दीपिकाने २०१९ साली अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळली होती. मात्र आता दीपिकाने या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी माहितीदेणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत ती म्हणाली आहे की, ”या संघटनेच्या संचालक मंडळात असणं आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं हा खरचं खूप काही शिकवणारा अनुभव होता. कलाकार म्हणून जगभरातून चित्रपट आणि प्रतिभावान कलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणं हे खूप जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम होतं. पण मला असं लक्षात आलं आहे की, माझ्या सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी MAMI च्या कामाकडे आवाश्यक तेवढे लक्ष देवू शकेन. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले ऋणनुबंध शेवटपर्यंत कायम राहतील.”असे म्हणत दीपिकाने या संस्थेच्या अध्यक्षपदापासून निरोप घेतला आहे.

 दीपिका लवकरच रणवीर सिंगसोबत ‘८३’या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती माजी क्रिकेटवीर कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

- Advertisement -

हे वाचा- अभिनेत्री ,लेखिका शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -