घरमनोरंजनफडणवीसांना कळतंय ना ते काय बोलतायत? टोलवसुलीवरून अभिनेत्री तेजस्वीनी पंडितही संतापली, व्हिडीओ...

फडणवीसांना कळतंय ना ते काय बोलतायत? टोलवसुलीवरून अभिनेत्री तेजस्वीनी पंडितही संतापली, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

तेजस्विनीने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हे काय बोलतायत हे त्यांना कळतंय का? आम्ही जो टोल भरत आहोत तो कोणाच्या खिशात जातोय? असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करत विचारला आहे.

टोल दरवाढीवरून मनसे आक्रमक झाला आहे. टोलवसुलीवरून मनसे अधय्क्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. याला आता चित्रपटसृष्टीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तेजस्विनीने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हे काय बोलतायत हे त्यांना कळतंय का? आम्ही जो टोल भरत आहोत तो कोणाच्या खिशात जातोय? असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करत विचारला आहे. सोबतच यावर आता तुम्हीच काहीतरी करा, असं राज ठाकरेंना म्हटलं आहे. (Does Devendra Fadnavis know what they are talking about Actress Tejashwwini Pandit also got angry over toll collection video went viral )

तेजस्विनी पंडितचं ट्वीट काय? 

देवेंद्र फडणवीसांना खासगी वाहनांकडून टोलवसुली केली जात नसल्याचं वक्तव्य करताच अभिनेत्री तेजस्वी पंडितनं फडणवीसांचा हा व्हिडिओ ट्वीट करत फडणवीसांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं. तेजस्वी पंडितनं म्हटलं आहे की, फडणवीसांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कोणाच्या खिशात जात आहे? राजसाहेब तुम्ही आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून! माननीय उपमुख्यमंत्री असे विधान तरी कसे करू शकतात, असं ट्वीट तेजस्विनी पंडित हिने केलं आहे.

- Advertisement -

टोलदरवाढीच्या मुदयावर राज ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच, टोलनाके बंद केले नाहीत तर टोलनाके जाळून टाकून असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

(हेही वाचा: अक्षय, अजय आणि शाहरुखची नवी जाहिरात पाहून युझर्स संतप्त )

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे?

टोला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाही, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरा टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -