…..मला चुकीचे समजू नका, Sidhu Moosewala ची ती शेवटची पोस्ट चर्चेत, चाहते झाले भावूक

पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिध्दू मूसेवालाची काल संध्याकाळी भयानक प्रकारे गोळी मारून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या भर रस्त्यात सिध्दू मूसेवालावर एका पाठी एक २० गोळ्या मारण्यात आल्या. सिध्दू मूसेवालावर झालेल्या या भयानक हल्ल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या केवळ २८ व्या वर्षी सिध्दू मूसेवालाने या जगाचा निरोप घेतलेला आहे. सिध्दू मूसेवालाच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर त्याच्या गाण्याचे जुने व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. अशातच आता सिध्दू मूसेवालाच्या इंस्टाग्राम वरील शेवटची पोस्ट सुद्धा सध्या चर्चेत आहे.

४ दिवसांपूर्वी सिध्दू मूसेवालाने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने पंजाबी भाषेत लिहिले होते की, “मला विसरून जा, परंतु मला चुकीचे समजू नका”. सिध्दू मूसेवालाच्या या पोस्टला ९६ लाख पेक्षा जास्त व्यूज मिळाल्या आहेत. सिध्दू मूसेवालाची ही पोस्ट आता त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

याशिवाय सिध्दू मूसेवालाच्या शेवटच्या ट्विटर अकाउंटवरच्या पोस्टमध्ये त्याने एका बंदूकी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये “U DONEEEEEEE?”. असं लिहिलं होतं. सिध्दू मूसेवालावर अनेकवेळा तो त्याच्या व्हिडिओ मधून बंदूकीसोबत दिसत असल्यामुळे त्याच्यावर अनेक केस सुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या. २९ रोजी सिध्दू मूसेवालावर गोळीबार करून हत्या करण्यात आली.

 


हेही वाचा :चित्रपट महोत्सवातील 718 चित्रपटांतून ‘इरगाल’ चित्रपटाने पटकावला बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड