Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन पतीच्या निधनानंतर मयुरीने घेतलेल्या निर्णयासाठी चाहत्यांकडून होतंय कौतुक

पतीच्या निधनानंतर मयुरीने घेतलेल्या निर्णयासाठी चाहत्यांकडून होतंय कौतुक

आशुतोषच्या आत्महत्येमुळे मयुरी आणि तिच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला होता. मात्र मयुरी आता या धक्क्यातून हळूहळू स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Story

- Advertisement -

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘खुलता कळी खुलेना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिने अल्पवधीतच रसिकप्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मयुरीने २०१७ मध्ये आशुतोष भागरे याच्याशी लग्न केले होते. आशुतोष भागरेदेखील एक अभिनेता होता. मात्र मयुरीच्या नवऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. आशुतोषने नैराश्येतून आपले जीवन संपवण्याचा माहिती समोर आली होती. आशुतोषच्या आत्महत्येमुळे मयुरी आणि तिच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला होता. मात्र मयुरी आता या धक्क्यातून हळूहळू स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मयुरीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या भविष्याबाबत काय विचार केला आहे हे सांगितले होते. ”मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करते. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?

मयुरी सध्या इमली या मालिकेत काम करत असून तिच्या कामाचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहेत. मयुरीने लिहिलेले डिअर आजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक प्रेक्षकांना विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी मिळणार आहे. मयुरीने तीन वर्षांपूर्वी हे नाटक लिहिले होते. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे.


- Advertisement -

हे वाचा-  ‘फॅंड्री’ फेम राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण

- Advertisement -