गुरमीत-देबिनाची श्रीलंका ट्रीप पडली महागात; झाली इन्फ्लूएंजा बी विषाणूची लागण

हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री देबिना बॅनर्जी नुकतीच श्रीलंकेच्या ट्रिप वरुन परतली आहे. ती तिचा पती गुमिरत चौधरी आणि दोन्ही मुली दिविशा-लियाना यांच्यासोबत श्रीलंकेला गेली होती. मात्र, आता त्या ट्रिपवरुन आल्यानंतर तिला इन्फ्लूएंजा बी या व्हायरल आजाराचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे आता ती तिच्या कुटुंबापासून दूर राहत असून सध्या या आजारावर उपचार घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देबिना बॅनर्जीची मागील काही दिवसांपासूनच प्रकृती ठीक नव्हती. ती याबाबत सर्व खबरदारी देखील वेळोवेळी घेत होती. मात्र, तरीही तिला इन्फ्लूएंजा बी या विषाणूची लागण झाली. दरम्यान, आता देबिनाच्या वतीने एक तिच्या प्रवक्त्याने निवेदन केलं आहे. ज्यात लिहिलंय की, “मी सांगू इच्छितो की ती आता बरी होत आहे. ती योग्य ती खबरदारी देखील घेत आहे. तिच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. ती लवकरच बरी होऊन पुनरागमन करेल.”

मुलींसोबत गुरमीत-देबिनाची पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप

गुरमीत-देबिनाने आपल्या मुलींसोबतची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रिप केली. हे दोघे व्हॅलेनटाईन्स डे आणि अ‍ॅनिव्हरसरी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत श्रीलंकेच्या ट्रीपवर गेले होते. मात्र, या ट्रीपमध्ये देखील देबिनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता हे तिने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितले होते.

 


हेही वाचा :

ऑस्ट्रेलिया कॉन्सर्ट रद्द होताच फरहान अख्तरकडे चाहत्यांनी मागितले पैसे