Vinod Khanna Birth Anniversary: विनोद खन्ना यांचा व्हिलन ते अभिनेता असा प्रवास

शाळेत असताना शिक्षकांनी विनोद खन्ना यांचा अभिनय आणि नाटकाशी परिचय करुन दिला

Happy BirthayVinod Khanna : Vinod Khanna's journey from villain to actor
Vinod Khanna Birth Anniversary: विनोद खन्ना यांचा विलन ते अभिनेता असा प्रवास

‘विनोद खन्ना’ (Vinod Khanna) बॉलिवूडमधील असा अभिनेता ज्याने व्हिलनपासून हिरोपर्यंतच्या सर्व भूमिका निभावल्या. भारत पाकिस्तान फाळणीवेळी पाकिस्तानी सीमांचे उल्लंघन करुन भारतात आलेला मुलगा बॉलिवूडचा स्टार झाला. आज विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस. दिल्लीत येऊन शिक्षण घेऊन आपले कुटुंब सांभाळून बॉलिवूडमध्ये नाव करणाऱ्या विनोद खन्ना यांचा प्रवास काही सोपा नव्हता. विनोद खन्ना यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया त्याचा विलन ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास.

१९४७ साली विनोद खन्ना पेशावर येथून आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आले. काही वर्षांनी ते दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर दिल्लीत त्यांनी विनोद खन्ना यांनी शिक्षण घेतले. शाळेत असताना शिक्षकांनी विनोद खन्ना यांचा अभिनय आणि नाटकाशी परिचय करुन दिला. शाळेतून सुरू झालेला विनोद खन्ना यांचा अभिनयाचा प्रवास सिल्वर स्क्रिनपर्यंत सुरू राहिला.

सुरुवातीच्या काळात विनोद खन्ना बॉलिवूडमध्ये आले तेव्हा त्यांना विलनच्या भूमिका मिळत होत्या. विनोद खन्ना सिनेमात डाकूच्या भूमिकेत दिसायचे. धोती,कुर्ता आणि डोक्यावर मोठा काळा टिका लावून विलनच्या भूमिकेत समोर येणारे विनोद खन्ना लीड हिरोपेक्षाही उठून दिसायचे. एका काळ असा होता जेव्हा विलनची भूमिका साकारणाऱ्या विनोद खन्ना यांना पाहण्यासाठी तरुण वर्ग गर्दी करत होता.

विनोद खन्ना यांनी पहिल्यांदा सुनील दत्त यांच्या ‘मन की बात’ या सिनेमातून पहिल्यांदा विलनची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘आन मिलो सजना’, ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’ यांसारख्या सिनेमातून विनोद खन्ना यांनी सहाय्यक किंवा खलनायकाची भूमिका साकारली होती.

विनोद खन्ना हे जवळपास ८ वर्षे ओशो आश्रममध्ये राहिले होते. आश्रमातून परत आल्यानंतर ते पुन्हा एकदा सिनेसृष्टीकडे वळले. त्यावेळीस त्यांची परिस्थिती फार वाईट होती. त्यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाल्याने ते मानसिकरित्या तुटले होते. तरीही त्यांनी ‘दयावान’, ‘चांदनी’, ‘क्षत्रिय’ सारख्या सिनेमात काम केले आणि आपल्या अभिनयाचा करिष्मा पुन्हा प्रेक्षकांसमोर सादर केला. विनोद खन्ना एक असे अभिनेते होते ज्यांच्या कोणताही अभिनयची पार्श्वभूमी नव्हती. मात्र त्यांच्या लहानपणापासून त्यांच्यात अभिनयाविषयी प्रेम होते जे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांनी पाहिले आहे.


हेही वाचा – ‘रामायण’ मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड, अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मुंबईत निधन