फरदीन खानला ओळखणं झालं कठीण, जबरदस्त बॉडी ट्रान्स्फॉर्मेशन

गेल्या अनेक वर्षांपासून फरदीन खान सिनेसृष्टीपासून दूर गेला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांचे फोटो समोर आले होते, मात्र त्यात त्याचे वाढलेले वजन पाहून त्याला अनेकजण ओळखू शकले नाही. परंतु आता नुकतेच त्यांचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये फरदीन खान त्याच्या जुन्या लूकमध्ये परत आला आहे.

ईद पार्टीमध्ये दिसला फरदीन खान
फरदीन खान कोणत्या चित्रपटात दिसून येईल याची अनेकांनाच उत्सुकता होती. परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की, सलमान खान , अनिल कपूर सोबतच फरदीन खानची एन्ट्री सुद्धा ‘नो एन्ट्री 2’ या चित्रपटामध्ये होणार आहे.

फरदीन खानचा नुकताच समोर आलेला फोटो ईदच्या कार्यक्रमातील आहे, जिथे तो त्याच्या चाहत्यांना भेटला, फरदीन खानमधील हा जबरदस्त बदल पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर हुमा कुरैशीच्या ईद पार्टीमधील फरदीन खानचे हे फोटो वायरल होत आहेत. अनेकजण त्याच्या फोटोला कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

फरदीन खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. फरदीन खानला त्याच्या जुन्या डॅशिंग लूकमध्ये पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत.

 


हेही वाचा :Lock upp : तेजस्वी प्रकाशने केली कंगना रनौतच्या ‘लॉकअप’मध्ये एन्ट्री