Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन हुमा कुरेशीचा 'महारानी' मधील नवा लूक

हुमा कुरेशीचा ‘महारानी’ मधील नवा लूक

हुमाच्या लैला या वेबसिरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ती लवकरच एका नवीन लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Related Story

- Advertisement -

गॅंग्स् ऑफ वासेपूर फेम हुमा कुरेशी आपल्या मादक अदांनी नेहमीच तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अल्पवधीतच तिने सिनेसृष्टीत आपली ओळख तयार केली आहे. ती नेहमीच नवनवीन वेबसीरिजच्या माध्यमातून स्वत:चा दमदार अभिनय प्रेक्षकांनसमोर घेवून येत असते. हुमाच्या लैला या वेबसिरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ती लवकरच एका नवीन लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. हुमा सोनी लिव्हरवरील ‘महारानी’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर चांगलाच व्हायरल होत असून १० मिलियनपेक्षा अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या टिझरमधील हुमाच्या लूकला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळत आहे. या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी रानी भारती ही मुख्य भूमिका साकारणार आहे. साधी कॉटनची साडी, मोठी टिकली, कुंकवाने भरलेला भांग असा हुमाचा ट्रेलरमधील टीपिकल लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच हुमाची देहबोली आणि संवाद यामुळे प्रेक्षकांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही वेबसीरिज हुमाच्या करिअरमधील महत्त्वाचे वळण ठरु शकते असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

एका सामान्य महिलेचा गृहिणी ते मुख्यमंत्री असा प्रवास या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या जीवनावर आधारित ‘महारानी’ ही वेबसीरिज असणार आहे. बिहारच्या राजकारणातील उलथापालथ या सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायल मिळेल. या सीरिजमध्ये हुमासोबत सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक आणि इनाम उल हक हे कलाकार झळकतील. या वेबसीरिजनंतर हुमा लवकरच अक्षय कुमारसोबत ‘बेल बॉटम’ या चित्रपटात झळकणार आहे. २ एप्रिल ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.


हे वाचा- हिंदी बोलण्यास विरोध केलेल्या व्हायरल व्हिडिओ बाबत ए आर रेहमान यांनी केला खुलासा

- Advertisement -