Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन इशिता दत्ताने शेअर केले बेबी बंपचे फोटो

इशिता दत्ताने शेअर केले बेबी बंपचे फोटो

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा खास व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा पती वत्सल सेठही तिच्यासोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इशिताने पेस्टल कलरमध्ये फ्लोरल हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. मॅटर्निटी शूटदरम्यान इशिताने वत्सलसोबत वेगवेगळ्या पोज दिल्या. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. इशिताचा पती अभिनेता वत्सल सेठ यानेही पेस्टल रंगाचा पँट सूट परिधान केला. या व्हिडिओमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

इशिताच्या या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट्स करत तिला शुभेच्छा देत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, ‘व्वा किती क्यूट दिसत आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.’ तर एका चाहत्याने म्हटलंय की, ‘खूप सुंदर, तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.’

‘दृश्यम’मध्ये साकारली होती अजयच्या मुलीची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

- Advertisement -

इशिता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. इशिताने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू सिनेसृष्टीतून केली होती. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘चाणक्युडु’ होते. बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगणसोबत ‘दृश्यम’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता ‘दृश्यम 2’ मध्ये देखील दिसली होती.

 


- Advertisement -

हेही वाचा :

हॉलीवूडस्टार जॉनी डेप करणार ‘मोदी’ सिनेमाचं दिग्दर्शन

- Advertisment -