घरमनोरंजन'गली बॉय' ऑस्करमधून बाहेर;कंगनाची बहिण रंगोली म्हणते...

‘गली बॉय’ ऑस्करमधून बाहेर;कंगनाची बहिण रंगोली म्हणते…

Subscribe

झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये मात्र ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे गली बॉयचे चाहते नाराज झाले आहेत.
या यादीत द पेन्टेड बर्ड, टूथ अॅण्ड जस्टिस,लेस मिसरेब्लस,दोज हू रीमेन्स,हनीलँण्ड, कॉर्पस,क्रिस्टी,बीनपोल,अटलांटिक्स, पॅरासाईट,पेन अॅण्ड ग्लोरी या चित्रपटांचा समावेश आहे.

‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील रणवीर व आलियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१९ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.झोया अख्तरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता.

- Advertisement -

गली बॉयची ऑस्करवारी चुकल्यामुळे सगळे नाराज असताना कंगनाची बहिण रंगोलीने मात्र ट्विट करत हा चित्रपट हॉलिवूडची कॉपी असल्याचे म्हटले आहे. ८ मिले या चित्रपटावर आधारीत गली बॉय हा चित्रपट आहे. हा चित्रपट उरी आणि मणिकर्णिका या चित्रपटांसारखा हा चित्रपट ओरीजनल आहे. हॉलिवूड अशा कॉपी असणाऱ्या चित्रपटांना कधीच अॅवॉर्ड देणार नाही. चंदेलीने अशा प्रकराचं वक्तव्य हे काही पहिल्यांदा केलेलं नाही. या आधीही तीने आलीया अॅवॉर्डवरून सुनवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -