घरमनोरंजनकंगनाने साधला हृतिकवर निशाणा; म्हणाली...

कंगनाने साधला हृतिकवर निशाणा; म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशनच्या अफेअरची चर्चा होताना दिसतेय

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशनच्या अफेअरची चर्चा होताना दिसत आहे. हृतिकने कंगना विरोधात एक एफआयआर दाखल केली होती. आता हे प्रकरण सायबर सेलकडून क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कंगनाने हृतिकवर चांगलाच निशाणा साधला आहे. हृतिकबद्दल बोलताना कंगनाने सोशल मीडियावर लिहिले की, ‘एका छोट्याशा अफेअरसाठी कधीपर्यंत रडणार.’

दरम्यान, मुंबईच्या सायबर सेल युनिटमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं स्पष्ट झाले होते. तर हृतिकच्या वकिलांनी मुंबई आयुक्तांना पत्र लिहून या संदर्भातील प्रकणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती मिळतेय. यानंतर गुन्हे शाखेचे प्रभारी आणि मुंबई पोलीस सहआयुक्त यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सायबर सेलऐवजी गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे सोपिवण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणीची कंगनाने आपले मत व्यक्त करताना असे ट्वीट केले, ‘रडण्याची कहाणी पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्षे झाली, पण तो पुढे जाण्यास तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करायलाही तयार नाही.’ यासह कंगना पुढे असेही म्हणाले, ‘जसं मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तो पुन्हा तेच सर्व नाटक सुरू करतो. हृतिक रोशन, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील.’

- Advertisement -

२०१३ ते २०१४ दरम्यान अभिनेता हृतिक रोशन यांच्याकडे साधारण १०० ईमेल मिळाले होते. यावेळी त्याने सांगितले होते की, ते सर्व ईमेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात हृतिकने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कंगनाने तिचा ईमेल हॅक झाला असून तिने हृतिकला कधीही मेल पाठवले नाही, असे सांगितले होते.


‘आश्रम’ पुन्हा वादच्या भोवऱ्यात, बाबा निरालासह निर्मात्याला कोर्टाची नोटीस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -