घरमनोरंजनरोनाल्डोच्या 'त्या' निर्णयावर आता करीनाने शेअर केले मजेशीर मिम्स

रोनाल्डोच्या ‘त्या’ निर्णयावर आता करीनाने शेअर केले मजेशीर मिम्स

Subscribe

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या कोका कोला सॉफ्ट ड्रिंक प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला आहे. एका पत्रकार परिषदेत रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला ठेवत सर्वांना पाणी पिण्याची विनंती केली होती. यासदंर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर  मिम्सचा जणू पुरचं आला आहे. रोनाल्डोच्या या कृतीचे आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यात आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. करीनाने आपल्या चित्रपटातील ‘पाण्याचं काम पाणीच करु शकतो’ या वाक्यातून रोनाल्डोच्या कृतीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाची ही प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.

रोनाल्डोच्या व्हिडीओवर करीना कपूर खाननं तिच्या शैलीत एक हटके प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत‘जब वी मेट’ या चित्रपटातील तिचा प्रसिद्ध डायलॉग लिहिला आहे. करीनाने लिहिलं आहे की, ‘कोक-सोडा सर्व काही त्याच्या जागी आहे, पाणी पाण्याचं काम करतं.’ करीनाच्या या पोस्टवर आता चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून अनेक चाहत्यांनी ही पोस्ट प्रचंड आवडली आहे. सध्या करीनाच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात व्हायरल केले जात आहे.

- Advertisement -

केआरकेने आता विद्या बालनशी घेतला पंगा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -