करिनाच्या एका नकारामुळे कंगना झाली बॉलिवूड क्वीन

बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच्या आपल्या विविध विषयांवरील मुद्दांमुळे चर्चेत असते. शिवाय कंगना तिच्या चित्रपटांमुळे देखील सतत चर्चेत असते. 2006 मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागील 17 वर्षांपासून कंगना बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. यादरम्यान, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आजही प्रेक्षक कंगनाच्या गँगस्टर मधील दमदार भूमिकेला विसरलेले नाहीत. या चित्रपटाने कंगनाला बॉलिवूड क्वीन ही पदवी दिली. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? करिना कपूरच्या एका नकारामुळे कंगनाला ही भूमिका मिळाली होती.

करिनाच्या एका नकाराने कंगना झाली बॉलिवूड क्वीन

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

2006 मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगनाच्या या चित्रपटातील भूमिकेने तिला रातोरात स्टार केलं. तेव्हापासून कंगनाला बॉलिवूड क्वीन ही ओळख मिळाली. मात्र, या चित्रपटातील कंगनाने साकारलेल्या भूमिकेसाठी सुरुवातील करिना कपूरला पसंती देण्यात आली होती. मात्र, करिनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ज्यामुळे कंगनाला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं कंगनाने सोनं केलं आणि ती रातोरात बॉलिवूड क्वीन झाली.

दरम्यान, कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा :

एसएस राजामौली बनवणार महाभारतावर आधारित 10 भागांचा चित्रपट