विक्रम भट्टच्या दुसऱ्या लग्नावर मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘त्यांच्या या लग्नावर मी खुश आहे’

krishna bhatt reaction on father vikram bhatt second marriage
विक्रम भट्टच्या दुसऱ्या लग्नावर मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली, 'त्यांच्या या लग्नावर मी खुश आहे'

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या गुपचूप लग्न केल्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विक्रम भट्ट यांनी श्वेतांबरी सोनीसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान विक्रम यांनी श्वेतांबरीसोबत लग्नगाठ बांधली आणि याचा खुलासा एकावर्षानंतर केला. यामुळे सर्वत्र विक्रम भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्टने आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Bhatt (@krishnavbhatt)

व्रिकम भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी आदिती भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट आहे. इंडिया टुडेसोबत बातचित करताना कृष्णा म्हणाली की, माझ्या आई-वडिलांचा २५ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. मला समजण्यास थोडा वेळ लागला. मला माझ्या आई-वडिलांसोबत न राहण्याची सवय झाली आहे. जेव्हा मी मोठी झाली तेव्हा मला नातं समजायला लागलं. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. ज्यामध्ये आनंद मिळतो, तेच प्रत्येकजण करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Bhatt (@krishnavbhatt)

यादरम्यान विक्रम भट्ट यांच्या लग्नाबाबत कृष्णा पुढे म्हणाली की, मला खूप वेळानंतर वडिलांच्या लग्नाबाबत माहिती मिळाली. त्यांना आजही वाटते की, मी लहान आहे आणि या लग्नाच्या सत्याचा सामना करू शकणार नाही. आपल्या आई-वडिलांसाठी आपण केव्हाचं मोठे होत नसतो. मी आपल्या वडिलांच्या लग्नामुळे खुश आहे. माझ्यासाठी अजूनही हे नातं महत्त्वाचं आहे आणि ते कायम राहिलं. अजूनपर्यंत दुसऱ्या आई श्वेतांबरी सोनीसोबत बोलली नाही आहे.


हेही वाचा – Viral Post: घटस्फोटनंतर सामंथा नागा चैतन्याला म्हणते, ‘मैं तुम्हारी हूं और तुम मेरे’!