कुंडली भाग्य फेम अभिनेत्री मानसी करतेय लग्न, २ वर्षांपूर्वी मोडला होता साखरपूडा

२०१९पासून मानसी आणि कपिल एकमेकांना डेट करत आहेत

Kundali bhagya fem actress mansi shrivastav to marry kapil tejvani
कुंडली भाग्य फेम अभिनेत्री मानसी करतेय लग्न, २ वर्षांपूर्वी मोडला होता साखरपूडा

मालिकेच्या छोट्या पडद्यावरील कुंडली भाग्य मालिकेतील अभिनेत्री मानसी श्रीवास्तव लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतीच अभिनेत्री श्रद्धा आर्या, करिश्मा तन्ना यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यात त्यानंतर आता अभिनेत्री मानसीच्या लग्नाचा चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मानसी तिचा बॉयफ्रेंड असलेल्या कपिल तेजवानीसोबत लग्न करतेय. कपिल हा पेशाने एक फूड आणि ट्रव्हर फोटोग्राफर आहे. जानेवारी महिन्यात त्यांचे लग्न होणार आहे.  मानसी आणि कपिल यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी एका अँड फिल्मच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्या कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. तब्बल सात वर्षांनी दोघेही पुन्हा भेटले. २०१९पासून मानसी आणि कपिल एकमेकांना डेट करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार २०१९मध्ये मानसीचा मोहित अबरोल यांच्याशी साखरपूडा झाला होता. त्यांच्या लग्नाची घोषणा देखील झाली होती. जवळपास सहा वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते मात्र नंतर दोघांनी त्यांचे नाते संपवले. मोहितने मानसीवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मानसीचे तिचा कोस्टार अरहान बहल याच्याशी संबध असल्याचे मोहितला समजल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

आपण पाहिले तर अनेक टेलिव्हिजन अभिनेत्री सध्या लगीन घाईत आहेत. कुंडली भाग्य फेम श्रद्धा आर्या देखील लग्न करते. तिच्या प्री वेडिंगचे काही फोटो देखील समोर आले आहेत. श्रद्धाच्या लग्नाचे विधी देखील सुरू आहेत. १६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत राहणारा नेव्ही ऑफिसर राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचेही अरेंज मॅरेज आहे.


हेही वाचा – ‘इंग्रजांना का जबाबदार धरले नाही?’ वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगनाची नवी इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल