घरमनोरंजनललित झाला 'अर्जुन रेड्डी'

ललित झाला ‘अर्जुन रेड्डी’

Subscribe

मराठी अभिनेता ललित प्रभाकर लवकरच एका तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्जुन रेड्डी असं या तेलगू चित्रपटाचं नाव आहे.

दाक्षिणात्य चित्रपट आणि कलाकारांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये किती आहे याचे वेगळे दाखले देण्याची गरज नाही. एखादा दाक्षिणात्य चित्रपट बॉक्सऑफिसवर हीट ठरला नाही असं क्वचितच घडतं. या चित्रपटांचे हिंदी डब केलेले चित्रपटही हिट ठरले आहे. आता ही क्रेझ केवळ प्रेक्षकांमध्ये नाही तर मराठी कलाकारांमध्ये देखील आहे. मराठी अभिनेता ललित प्रभाकर सध्या विजय देवरकोंडेचा प्रचंड फॅन झाला आहे. ललितने हुबेहुब विजयसारखा लूक केला आहे.लवकरच एका तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्जुन रेड्डी असं या तेलगू चित्रपटाचं नाव आहे. लवकरच त्याचा हिंदी रिमेक येत आहे. या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडे आहे. सध्या या चित्रपटातील त्याचा लूक सुध्दा प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.

इन्स्टाग्रामवर टाकला फोटो

ललितने अजुर्न रेड्डी सारखा लूक करत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. आणि हा फोटो शेअर करताना अर्जून रेड्डी मराठीत करायचा का अशा प्रश्न त्याने विचारला आहे. ललित कायमच सोशलमिडीयावर सक्रीय असतो. तो कायमच त्याचे नानाविविध फोटो, व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर करत असतो.

- Advertisement -

शाहीद कपूर मुख्य भुमिकेत

अर्जुन रेड्डीच्या हिंदी रिमेकमध्ये शाहीद कपूर मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर चित्रपटात शाहीदबरोबर कियारा अडवाणी झळकणार आहे. २१ जून २०१९ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला य़ेईल. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाच चित्रीकरण करण्यात येईल.  

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -