घरमनोरंजनLok Kay Mhantil : सुश्रुत भागवत यांच्या "लोक काय म्हणतील? चित्रपटाचं पोस्टर...

Lok Kay Mhantil : सुश्रुत भागवत यांच्या “लोक काय म्हणतील? चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Subscribe

उदाहरणार्थ निर्मित चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच

‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि उदाहरणार्थ निर्मित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “लोक काय म्हणतील?” या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँच करून करण्यात आली आहे.

उदाहरणार्थ निर्मित संस्थेच्या अंतर्गत “लोक काय म्हणतील” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सुश्रुत भागवत दिग्दर्शित “८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी” ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Udharnarth nirmit (@udharnarth)

- Advertisement -

सुश्रुत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असेही एकदा व्हावे असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या लोक काय म्हणतील या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.

- Advertisement -

चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं “”लोक काय म्हणतील?” या चित्रपटाविषयी कुतुहल आहे.

यापूर्वी ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, निर्माता, दिग्दर्शक, ध्वनी आरेखन, निर्मिती व्यवस्थापन, छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अभिनेता असे सर्व पुरस्कार पटकावले. या चित्रपटात भिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.


वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी Janhavi Kapoor पोहोचली तिरुपतीला, पाहा फोटो

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -