घरमनोरंजनराजा-राणीच्या जोडीत नवं संकट, कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

राजा-राणीच्या जोडीत नवं संकट, कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

Subscribe

छोट्या पडद्यावरील राजा रानीची गं जोडी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घरं केलं. संजू आणि रणजीतच्या जोडीने अनेकांची मनं जिंकली आहेत. अशाकत मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. ढालेपाटीलांच्या घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल ताणतणावाचा झाला आहे. अपर्णाच्या स्वभावाचा त्रास सगळ्यांना होऊ लागला असून सुजित सोबतच घरातील सगळ्यांच्या डोक्यावर येऊन ती बसली. तरीदेखील संजू – रणजीत त्यामधून मार्ग काढत आहेत.

अपर्णाच्या धमक्या काही कमी होत नाहीये तर दुसरीकडे पंजाबराव, राजश्री आणि दादासाहेब यांची कटकारस्थानं काही थांबत नाहीयेत. दादासाहेब – राजश्री देखील काहीतरी कटकारस्थान करत आहेत यावर संजूला संशय आहे ?  संजू – रणजीत समोर नवीन संकटी उभी रहातात, ढाले  – पाटील कुटुंबाविरोधात कटकारास्थान रचली जातात पण आजवर संजूने खंबीरपणे रणजीतच्या साथीने त्यावर मात केली आहे. अपर्णाच्या वागणुकीने आता तिचाच घात तर नाही ना होणार ? असं कुठेतरी वाटू लागलं आहे. मात्र ढालेपाटीलांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपर्णानाच मृत्यू होणार असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

नुकतंच राजा रानीची गं जोडी चा एक प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये कुसुमावती ढालेपाटीलचं अपर्णाचा खून करणार असल्याचे दिसून येत आहे. यात त्यांनी अपर्णाच्या दिशेने बंदूक रोखली आहे.
यात अपर्णा आणि कुसुमावती यांना ढालेपाटील कुटुंबाला कशाप्रकारे संपवणार हे सांगतायत. तर कुसुमावती संपूर्ण कुंटुंबासाठी मी ढालीप्रमाणे उभी असून असं म्हणत अपर्णाला गोळी झाडतात. या बंदूकीतून सुटलेल्या गोळीचा आवाज ऐकूण रणजीत आणि संजू खोलीत येतात. मात्र कुसुमावती यांनी मारलेली गोळी अपर्णाला लागते की नाही हे पुढे स्पष्ट होईल.

- Advertisement -

दरम्यान राजा रानीची गं जोडी मालिकेत ढालेपाटलांची सत्ता मिळवण्य़ासाठी कुटुंबात कहल सुरु आहेत. या सगळ्या संकटांना कुसुमावती यांच्या विरोध असतानाही संजू आणि रणजीत य़ोग्य पद्धतीने सामोरे जात आहे. त्यामुळे मालिकेतील नव नवीन वळणं प्रेक्षकांनाही पसंतीस पडत आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -