मीराबाई चानूचं माधुरी दीक्षितला भेटण्याचे स्वप्न झाले पूर्ण,भावूक होऊन म्हणाली…

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचं सर्वत्र कौतुक होतंय. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात ती प्रसिध्द झाली आहे. मीराबाईची लहानपणापासूनची अनेक स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सलमान खानची मोठी फॅन असलेल्या मीराबाईला रौप्य पदक जिंकल्यानंतर सलमानची भेट घेण्याची संधी मिळाली.

नुकतेच मीराबाईने ‘डान्स दीवाने’ या शोला भेट दिली. यावेळी माधुरी दीक्षितला भेटण्याचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. माधुरीला पाहताच मीराबाईचा आनंद ओसंडून वाहत होता. या भेटीने मीराबाई खुप भावूक होऊन तिचे आश्रु अनावर झाल्याचे दिसून आले.

‘डान्स दीवाने’ शोमध्ये ‘सलाम इंडिआ’ या नावाचा १५ ऑगस्टच्या निमित्ताने एक एपिसोड पाहायला मिळणार आहे. या खास भागात माजी क्रिकेटर कपील देव तसंच मोहिंदर अमरनाथ , लाली भवानी देवी आणि प्रिया मलिक यांची खास उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या भागात मीराबाईच्या खडतर प्रवास दाखवणारा डान्स परफॉर्मन्स करण्यात आला आहे. हा परफॉर्मन्स पाहून मीराबाईसह प्रेक्षक देखील भावूक झाले.

या शोमध्ये मीराबाई म्हणाली, “या शोमध्ये येऊन मला खूप आनंद होत आहे. मी कधी विचारही केला नव्हता की मी या शोमध्ये येऊन माधुरी मॅमना भेटणं शक्य होईल. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. लहान पणापासूनच मला डान्सची आवड आहे.”असं म्हणत मीराबाईने तिचा आनंद व्यक्त केला. या शोमध्ये खास मीराबाईचा आवडता पदार्थ म्हणजेत पिझ्झा मागवण्यात आला होता. या साठीदेखील मीराबाईने सर्वांचे आभार मानले.