घरमनोरंजनप्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘Money Heist’ चा पाचवा सिझन लवकरच...

प्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘Money Heist’ चा पाचवा सिझन लवकरच…

Subscribe

मनी हाईस्टच्या चाहत्यांना पाचव्या सिझनची प्रतीक्षा आहे. प्रोफेसरने सुरू केलेला चोरीचा मामला संपवण्यासाठी तो पुन्हा येणार

प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारी मनी हाईस्ट ही वेब सीरिज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील ८ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. तरुणाईच्या मनात प्रोफेसर आणि इतर सर्वच पात्रांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. या सीरिजचे ४ सिझन प्रदर्शित झाले आहेत. आता मनी हाईस्टच्या चाहत्यांना पाचव्या सिझनची प्रतीक्षा आहे. प्रोफेसरने सुरू केलेला चोरीचा मामला संपवण्यासाठी तो पुन्हा येणार आहे.

मनी हाईस्ट या वेब सीरिजच्या पाचव्या भागाची घोषणा झाली असली तरी, प्रेक्षकांना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अल्वारो मोर्ते याने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या पाचव्या सीझनची घोषची केली. या सीरिजचं पाचवं पर्व येत्या ५ मे २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन देत अल्वारोने एक फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

It looks like we are coming to an end… #lcdp5 💥💥💥💥💥💥

A post shared by Álvaro Morte (@alvaromorte) on

- Advertisement -

भारतामध्येही या सीरिजला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. वेगवेगळ्या शहरांची नावं वापरुन चोऱ्या करणारे चोर आणि त्यांचा प्रोफेसर हे सगळंच पडद्यावर पाहायला तरुणाईला फारच आवडलं होतं.

चोरीचा सर्वात मोठा प्लान करुन पूर्णत्वास कसा नेला जातो. त्यात या चोरांना कशाप्रकारच्या अडचणी येतात. कमी दिवसात भरपूर पैसे कमवण्यासाठी प्रोफेसरने आखलेला मास्टर प्लान आणि त्याला त्यांच्या टीमची साथ अशी काहीशी सुरुवात पहिल्या सिझनमध्ये झाली होती. ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन अत्यंत निर्णायक वळणावर येऊन संपला होता. त्यामुळे पाचव्या सिझनची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात हा चौथा सिझन प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


Video: नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सलमान भडकला, म्हणाला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -