घरमनोरंजननागार्जुनने दिला आलिया-रणबीरला 'हा' खास आर्शीवाद; ऐकून दोघेही लाजले

नागार्जुनने दिला आलिया-रणबीरला ‘हा’ खास आर्शीवाद; ऐकून दोघेही लाजले

Subscribe

सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. हा चित्रपटाची संपूर्ण टीम शुक्रवारी रात्री हैदरबादमध्ये आयोजित केलेल्या एका इवेंटमध्ये दाखल झाली होती.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय या चित्रपटाची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट देखील पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक माहागडा चित्रपट आहे. दरम्यान,सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. हा चित्रपटाची संपूर्ण टीम शुक्रवारी रात्री हैदरबादमध्ये आयोजित केलेल्या एका इवेंटमध्ये दाखल झाली होती.

यावेळी या टॉलिवूडमधील काही कलाकारांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. तसेच अभिनेता नागार्जुनने इवेंटमध्ये बोलता बोलता रणबीर कपूर आणि आलियाचे खूप कौतुक केले. त्यावेळी तो म्हणाला की, त्याने रणबीर आणि आलियाला लहानपणापासून पाहिले आहे. ते वयाचे अंतर न पाहता माझे चांगले मित्र झाले. दोघेही यावेळी देशातील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. तसेच दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे.

- Advertisement -

आई-बाबा होणार म्हणून नागार्जुनने दिला आशीर्वाद
आलिया आणि रणबीर येत्या काळात आई-वडील होणार आहेत. याच संदर्भात देखील नागार्जुनने दोघांना सांगितले की, “मला वाटतं की तुमचं एक सुंदर मुल असावं. ते मुल तुमच्या दोघांच्या तुलनेत खूप मोठ्ठ नाव कमावेल.” नागार्जुनचं हे बोलण एकूण आलिया आणि रणबीर लाजले. तसेच त्यांनी नागार्जुनचे आभार मानले.

9 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित
अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा चित्रपट; 9 सप्टेंबर रोजी 8000 स्क्रिन्स वर होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -