Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नर्गिस फाकरीने उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे केले कबूल म्हणाली..

नर्गिस फाकरीने उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे केले कबूल म्हणाली..

नर्गिसने उदयचे वर्णन एक शानदार व्यक्ती म्हणून केले आणि म्हणाली की मला त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे न बोलल्याबद्दल खेदजनक वाटत आहे.

Related Story

- Advertisement -

अनेक बॉलिवूड (bollywood)कलाकार चित्रपटा व्यतीरिक्त त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील नात्यामुळे चर्चेत असतात. जरी कलाकारांमध्ये आपल्या कथित पार्टनरसोबत अनेकदा पार्टी ,इव्हेंट,व्हॅकेशन दरम्यान जवळीक साधतांना दिसत असली तरी, बऱ्याच वेळा ते अधिकृतपणे काहीही बोलत नाहीत. त्यापैकी एक अभिनेत्री नर्गिस फाकरी आहे. नर्गिस फाकरीचे (Nargis Fakhri )नाव अभिनेता आणि निर्माता उदय(Uday Chopra) चोप्रासोबत जोडले गेले होते.(Nargis Fakhri finally confesses she dated Uday Chopra for 5 years)

त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अनेक चर्चा माध्यामांमध्ये रंगत असे. आता खुद्द नर्गिसने उदय सोबत रिलेशनशिपमध्ये होती असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्याच्याशी संबंध तोडल्याबद्दलची दु:खी भावना व्यक्त केली आहे. नर्गिसने टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखती दरम्यान तिच्या आणि उदयच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. यादरम्यान, नर्गिसने तिच्या फिल्मी करिअरपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत बरेच काही सांगितले आहे.

- Advertisement -

नर्गिस फाकरीने उदय चोप्राचे वर्णन एक शानदार व्यक्ती म्हणून केले आणि म्हणाली की मला त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे न बोलल्याबद्दल खेदजनक वाटत आहे. नर्गिस  म्हणाली, ‘उदय आणि मी 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि तो मला भारतात भेटलेला सर्वात सुंदर व्यक्ती होता. मी हे प्रेसला कधीच सांगितले नाही कारण लोकांनी मला माझे नाते गुप्त ठेवण्यास सांगितले, पण मला खेद वाटतो कारण मी पर्वताच्या शिखरावरून ओरडायला हवे होते की मी इतक्या सुंदर व्यक्तीसोबत आहे. ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

- Advertisement -

नर्गिस  पुढे म्हणाली, ‘इंटरनेट आणि सोशल मीडिया अतिशय नकली जग आहे आणि तेथील लोकांना सत्य काय आहे हे कळणार नाही. बऱ्याचदा आम्ही बंद दारामागे उभ्या असलेल्या वाईट लोकांची पूजा करतो. दरवाज्या मागील लोकं फार वाईट आहेत ‘ नर्गिस फाकरीने उदय चोप्रासोबतचे नाते स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच वेळी, उदय सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती भारत सोडून अमेरिकेत गेली.


हे हि वाचा – Big B म्हणाले, माझे वैवाहिक जीवन संकटात! KBC13 च्या मंचावर खुलासा

- Advertisement -