Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन इंडियन आइडल शो मधून नेहा कक्कड गायब, शो मध्ये पुन्हा झळकणार अनु...

इंडियन आइडल शो मधून नेहा कक्कड गायब, शो मध्ये पुन्हा झळकणार अनु मलिक

चित्रीकरणास पुन्हा सुरूवात होत नाही तोपर्यंत सर्व मालिका आपले शूटिंग परराज्यात करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध शो इंडियन आइडल नेहमीच चर्चेच्या झोतात असतो. या शो मधील गायकांची मोठ्या प्रमाणात लोकं प्रशंसा करतात. इंडियन आइडल मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या  शो मधील प्रसिद्ध जज नेहा कक्कड शो  मधून गायब झाली आहे. गेल्या काही एपिसोड मध्ये नेहाची अनुपस्थिती पाहता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने कडक लॉक डाउन घोषित केलं आहे. तसेच चित्रीकरणास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. यामुळे इंडियन आइडलचे शूटिंग सध्या दमन मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. यामुळे पुढील काही भागात सुरक्षेच्या करना अंतर्गत इंडियन आइडल मधील तिघही जज शो मधून काही काळ अंतर राखणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेहा कक्कड हिने तिच्या आगामी प्रोजेक्ट साठी तसेच कोरोना व्हायरसच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काही दिवस शो पासून दूर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पुढील काही भाग अनु मलिक आणि मनोज मुंतशीर जज करणार आहेत. इंडियन आइडल शो मधील रॉकींग होस्ट आदित्य नारायण याने कोरनाच्या रिकव्हरी नंतर पुन्हा शो मध्ये एंट्री केली आहे.महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउनमुळे अनेक हिंदी आणि मराठी मालिकांचे चित्रीकरण परराज्यात हलवण्यात आले आहे. जोपर्यंत राज्यात कोरोना व्हायरसची स्थिती सुधारात नाही आणि चित्रीकरणास पुन्हा सुरूवात होत नाही तोपर्यंत सर्व मालिका आपले शूटिंग परराज्यात करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हे हि वाचा – कोरोना संकटात लोकांच्या हिंमतीचे कौतुक करत सुश्मिता सेनची भावनिक पोस्ट

- Advertisement -