घरमनोरंजनOTT क्विन रसिका दुग्गलची, या प्रसिद्ध वेब सिरीजच्या पुढील सीझनही लागणार वर्णी

OTT क्विन रसिका दुग्गलची, या प्रसिद्ध वेब सिरीजच्या पुढील सीझनही लागणार वर्णी

Subscribe

2007 साली आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री रसिका दुग्गल ओटीटी  प्लॅटफॉर्म गाजवत आहे

काही वर्षापूर्वीच आलेल ओटीटी माध्यम सध्या सगळीकडेच धुमाकूळ माजवत आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारा नंतर आता ओटीटी हा चांगलाच भाव खाऊन जात आहे. सुरूवातीला फक्त वेब सिरीजने यावर आपला कब्जा मिळवला होता. काही प्रमाणातच चित्रपट प्रदर्शित होत असे.  पण आता अनेक बिग बजेट तसेच बिग स्टारर सिनेमा प्रदर्शनासाठी ओटीटी कडे वळू लागले आहेत. अशातच ओटीटी वर प्रदर्शित होणार्‍या अनेक सुप्रसिद्ध वेब सिरीजने प्रेक्षकांना अगदी भांबावून सोडलं आहे. प्रेक्षक अगदी आतुर होऊन या वेब सिरीजच्या दुसर्‍या सीझनची वाट पाहतात. वेब सिरीज मधील अगदी लहनतील लहान किंवा मुख्य पत्राच्या अभिनयाचे कोडकौतुक प्रेक्षक करतात . 2007 साली आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री रसिका दुग्गल ओटीटी  प्लॅटफॉर्म गाजवत आहे सध्या रसिका ओटीटी वरील क्वीन म्हणून ओळखली जाते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikadugal)

- Advertisement -

रसिका अनेक प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुर, मिर्झापूर 2 ,दिल्ली क्राईम,आऊट ऑफ लव मधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. आता रसिका या वेब सिरीजच्या पुढील सीझन मध्ये सुद्धा प्रेक्षकांना दिसणार आहे. आपल्या अभिनयाद्वारे मनोरंजन करण्यास रसिका पुन्हा सज्ज झाली आहे. रसिकाने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान दुसर्‍या सीझन मध्ये कामकरण्या बद्दलची तिची प्रतिक्रिया देताना म्हणते ” पुढील सीझनसाठी काम करण्यास सुरुवात केल्यावर असे वाटते की आपल्या जुन्या मित्राला पुन्हा भेटत आहोत. माला खूप आनंद होत आहे  मी ज्या-ज्या वेब सिरीज मध्ये काम केल आहे त्याचा दूसरा सीझन सुद्धा येतोय. आणि प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वेब सिरीज मधील पात्र आणि कथा कशा प्रकारे वळण घेते हे पाहणं मला नेहमी मजेशीर वाटते.”

- Advertisement -

हे हि वाचा – ”पॉलिटिकल क्लासचे हात रक्ताने रंगलेत”, पूजा भट्टची केंद्र सरकारवर टिका

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -