Padma Lakshmi | पद्मा लक्ष्मीने शेअर केला ‘नान बेडशीट’चा फोटो, अन् नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Padma Lakshmi | Padma Lakshmi shared a photo of 'Nan Bedsheet', a troll by netizens
Padma Lakshmi | पद्मा लक्ष्मीने शेअर केला 'नान बेडशीट'चा फोटो, अन् नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मॉडेल आणि लेखिका पद्मा लक्ष्मी ही आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखली जाते.याशिवाय सोशल मिडियावर तिचे बरेच फॉलोवर्स आहेत. ती सोशल मिडियावर चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मात्र तिने शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.पद्माने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे,ज्यामध्ये नानसारखी थ्रीडी प्रिंटेड बेडशीट दिसत आहे. याशिवाय दोन उशाही फोटोमध्ये दिसत आहेत त्याचीही प्रिंट नानसारखी आहे. हा फोटो शेअर करत “नानबेड आणि २ उशा विकायच्या आहेत”,असे कॅप्शन दिले आहे.

हा फोटो व्हायरल होताच सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. नेटकरी मजेदार मीम्स शेअर करू लागले आहेत.


तर तिथे कोणीतरी थ्रीडी प्रिंटेड बेडशीटचा फोटो शेअर केला ज्यामध्ये अनेक साप आहेत. तर कोणी म्हणाले, सकाळी उठल्याबरोबर त्याचा नाश्ता करा, अशा वेगवेगळ्या कमेंट करत नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.


हा फोटो पोस्ट झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला. सुपर फनी कमेंट्ससह, नेटकरी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.


हे ही वाचा – तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले